पिंपरी: अयोध्या प्रकरणातील संभाव्य निर्णयाआधी कुणीही पोस्ट किंवा टिप्पणी शेअर करू नये. कोणाच्या श्रद्धा, भावनांवर परिणाम होऊ शकेल, अशा कोणत्याही धर्माशी संबंधित कोणतीही गोष्ट शेअर करू नये, असा आदेश पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिला आहे.
रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन विवाद प्रकरणातील खटल्याचा निर्णय नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत येईल, असा विश्वास आहे. कोर्टाच्या निर्णयापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने चार पानांचा आदेश जारी केला आहे. ज्यामध्ये अयोध्या जिल्ह्यात राहणाऱ्या लोकांना व्हॉट्सऍप, ट्विटर, टेलिग्राम आणि इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावर दोन महिन्यांपर्यंत देवाविषयी काही अवमानकारक टीका करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Pimpri-Chinchwad Police Comissionerate: It is advised that nobody should share a post or comment, or anything related to any particular religion which may affect somebody’s beliefs/sentiments, ahead of the probable verdict in Ayodhya case. #Maharashtra
— ANI (@ANI) November 5, 2019
हे सुद्धा वाचा
अयोध्या प्रकरण : निकालापुर्वीच पोलिसांचा प्लान सी ऍप तयार