अभिनेता सैफ अली खान मागच्या बऱ्याच काळापासून बॉलिपासून दूर आहे. आता सैफ लाल कप्तान या सिनेमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. त्यानंतर आता या सिनेमाच्या ट्रेलरचा पहिला भाग नुकताच रिलीज झाला असून यात सैफ अली खानचं अतिशय भयंकर रुप पाहायला मिळत आहे.
लाल कप्तानच्या या ट्रेलरमध्ये सैफ अली खान खूपच हिंसक रुपात दिसत आहे. क्लोजअप शॉट, कपाळावर राख आणि लाल टीळा, डोळ्यात काजळासोबतच थरकाप उडवणारी दहशत. या सिनेमात एका नागा साधूच्या बदल्याचा पर्वास पाहायला मिळणार आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच सैफ घोड्यावर बसून एका माणसाचे प्रेत खेचत नेताना दिसत आहे.
हा ट्रेलर ऑफिशयल ट्रेलर फर्स्ट पार्ट- द हंट या नावाने रिलीज करण्यात आला आहे.
या ट्रेलरच्या सुरुवातीचा सैफचा डायलॉग “आदमी के पैदा होते ही काल भैंसे पर बैठकर चल पड़ता है. उसे वापस लाने के लिए. आदमी की जिंदगी उतनी, जितना समय उस भैंसे को लगा उस तक पहुंचने में’. हा थरकाप उडवणारा आहे. याशिवाय यामध्ये सोनाक्षी सिन्हाचा व्हॉइस ओव्हर ऐकायला मिळतो. सोशल मीडियावर या ट्रेलर खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विशेष करुन सैफचा लुक आणि अभिनयाच कौतुक होत आहे.