मॉस्को – रशियातील सर्वात थंड प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायबेरियातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून गेल्या 120 वर्षातील रेकॉर्डही तापमानाने आता मोडले आहे.
जून महिन्यामध्ये साधारण सायबेरियाच्या प्रदेशांमध्ये मायनस 11 अंश सेल्सिअस तापमान असते. पण या उन्हाळ्यात सायबेरिया प्रांतातील कमाल तापमान ४८ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. युरोपियन युनियन ऑफ अर्थ सर्वेशन प्रोग्राम या संस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे, सैबेरियातील वारकन्स्क्स हे सर्वात उष्ण शहर राहिले.
शया शहरातील उष्णता एवढी प्रचंड वाढली होती की लोकांना घराबाहेर पडणेही मुश्कील होते. उष्णतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी पाण्याचे फवारे मारण्यात येत आहेत. चार कोटी लोकसंख्या असलेल्या सायबेरियातील सर्व नागरिकांना आगामी काही दिवस घरातच राहावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. कारण या नागरिकांना अशा प्रकारच्या उष्णता सहन करण्याची सवय नाही. अचानक अशी उष्ण्ता का वाढली आहे याबाबत संशोधन करण्यात येत आहे.