नवी दिल्ली – प्रदीर्घ काळ चालेलेले लॉकडाऊन आणि बेसुमार दरवाढीमुळे सोन्याची आयात पहिल्या तिमाहीत तब्बल 94 टक्क्यांनी कमी झाली आहे. एप्रिल ते जून या काळात पहिल्या तिमाहीमध्ये केवळ 5,160 कोटी रुपयाच्या सोन्याची आयात झाली. गेल्या वर्षी या तिमाहीत 86,250 कोटी रुपयांची आयात झाली होती.
केवळ सोन्याची आयात कमी झाली नाही तर या परिस्थितीचा चांदीच्या आयातीवरही परिणाम झाला आहे. पहिल्या तिमाहीत चांदीची आयात 45 टक्क्यांनी कमी होऊन ते केवळ 4,300 कोटी रुपयांची झाली. सोन्याची आयात कमी झाल्यामुळे भारताची व्यापारातील तूट कमी होऊन ती केवळ 9.12 अब्ज डॉलर एवढी झाली आहे. गेल्या वर्षी चांदीची आयात 45.96 अब्ज डॉलर इतकी होती. आता दागीन्याची मागणी जास्त दर असल्यामुळे कमी झाली आहे. केवळ गुंतवणुकीसाठी सोन्याची खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे.