पुणे (संजय कडू) – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा 1 च्या पथकाने मोक्का मधील फरार आरोपीस जेरबंद केले. त्याने एका जमिनीच्या व्यवहारात महसुल दप्तरी हरकत घेऊन तडजोडीसाडी तीन कोटीची मागणी केली होती. टोळी प्रमुख रविंद्र बऱ्हाटे मात्र अद्यापही इतर साथीदारांसह फरार आहे. प्रशांत पुरुषोत्तम जोशी (46 रा -कोथरुड) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी यांनी दाखल केलेल्या गुन्हयातील आरोपी रविंद्र ब-हाटे, देवेंद्र जैन, शैलेश जगताप, परवेझ जमादार, जयेश जगताप, प्रशांत जोशी, प्रकाश फाले, संजय भोकरे, विशाल तोत्रे, प्रेमचंद रतनचंद बाफना, प्रशांत बाफना, हरिष किरण बाफना, राज किरण बाफना, विनय मुंदडा यांनी सन 2016 ते फेब्रुवारी 2021 या दरम्यान आपसात संगणमत व कट कारस्थान रचले होते. यामध्ये फिर्यादी व त्यांचे सहकारी यांचेविरुध्द खोटे गुन्हे दाखल करुन फिर्यादी यांचे मालकी, वहीवाटीची व ताब्यात असलेली पर्वती सहकारनगर येथील जमिनीचा व्यवहार करुन फिर्यादीच्या सहकाऱ्यांकडून 70 लाख रुपये घेतले होते. त्यांचा फसवणुक व विश्वासघात केला.
फिर्यादी यांची जमिन बळकविण्याचे उददेशाने महसुल दप्तरी हरकती घेवुन जमिनीच्या व्यवहारात तडजोडसाठी 3 कोटी रुपयाची मागणी केली. वेळोवेळी धमक्या देवुन फिर्यादी व त्यांचे सहकारी यांची प्रेस कॉन्फरन्स , प्रसार व इतर माध्यमातुन बदनामी करुन, फिर्यादी यांचे घरी हस्तक पाठवुन जमिन बळकविण्याचे उददेशाने जबरदस्ती करुन, धमकी देवुन कागदपत्रावर सहया करण्याची बळजबरी केली होती. तपासात सदर गुन्हयामध्ये मोका कलमांचा समावेश करण्यात आला. चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
दरम्यान दिनांक 26/6/21 रोजी युनिट -1 गुन्हे पुणे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे हददीमध्ये गस्त घालत असताना पोलीस अमंलदार सचिन जाधव व दत्ता सोनवणे यांना खबर मिळाली की, गुन्हयातील पाहीजे आरोपी प्रशांत जोशी हा त्याचे नातेवाईकांना भेटण्यासाठी गांधी भवन स्मारक कोथरुड येथे येणार आहे.
पोलीसांनी त्या भागात सापळा रचून संशयीत आरोपी प्रशांत पुरुषोत्तम जोशी हा त्याचे नातेवाईकास भेटण्यासाठी आला असता त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यास पुढील कारवाईसाठी सहायक पोलीस आयुक्त (चतुऋंगी विभाग) यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. यापुर्वी गुन्हयामध्ये प्रकाश रघुनाथ फाले (41 रा – सांगवी) यास अटक करण्यात आलेली आहे. आरोपी विशाल गजानन तोत्रे हा मार्च महिण्यात मयत झाला आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, उपायुक्त(गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस सुरेन्द्र देशमुख यांचे मार्गदशनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार विजेसिंग वसावे, अशोक माने, सचिन जाधव, दत्ता सोनवणे, अय्याज दडडीकर, इम्रान शेख, यांनी केली आहे.