पुणे – पुणे शहराची कायमस्वरुपी लोकसंख्या, तरल लोकसंख्या, ग्रामीण भाग आणि 23 गावांसाठी पाणीपुरवठा, टॅंकरद्वारे पाणीपुरवठा अशा एकूण 72 लाख 21 हजार नागरिकांसाठी वार्षिक 20.49 टीएमसी पाणीवापर होत आहे. प्रत्यक्ष मंजूर कोटा 14.61 टीएमसी असताना पालिकेकडून जादा पाणी उचलण्यात येत दावा जलसंपदा विभागाकडून करण्यात आला आहे.
खडकवासला प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा विभागाकडून सादरीकरणाद्वारे वस्तुस्थिती मांडण्यात आली. महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पुणे महापालिकेसाठी दैनंदिन पाणी वापर प्रतिमाणसी 150 लिटर इतका निश्चित केला आहे. मात्र, पालिकेच्या दैनंदिन पाणीवापरावरून जादा पाणी वापर उचलत असल्याचे दिसून येत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
- पाण्याच्या अंदाजपत्रकानुसार…
- नियमित लोकसंख्या – 56 लाख 37 हजार
- टॅंकरद्वारे पाणीपुरवठा -1 लाख 82 हजार
- ग्रामीण भागातील 11 व 23 गावांसाठी पाणीपुरवठा – 11 लाख 15 हजार
- तरल लोकसंख्या – 3 लाख 47 हजार
- एकूण – 72 लाख 81 हजार