नवी दिल्ली : आयपीएल 2023 चा अंतिम सामना जिंकून CSK ने ट्रॉफी जिंकली आहे. ही ट्रॉफी जिंकून चेन्नई मुंबई इंडियन्सच्या बरोबरीने पाच वेळा आयपीएल जिंकणारा संघ बनला आहे. आयपीएल सीझन 2023 संपला असेल पण त्याचे काही खास क्षण अजूनही चर्चेचा विषय आहेत.
या सामन्यात चेन्नईने 15 षटकांचा सामना खेळला ज्यामध्ये त्यांना विजयासाठी 171 धावांची गरज होती. शेवटच्या दोन चेंडूंमध्ये जडेजाच्या बॅटने जादू दाखवत एक षटकार आणि एक चौकार मारला. सामना जिंकल्यानंतर खेळाडूंमध्ये जल्लोष झाला. त्याचवेळी एका क्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि तो क्षण म्हणजे चेन्नईच्या विजयानंतर जडेजाची पत्नी रिवाबा हि भर मैदानावर जडेजाच्या पाया पडली.
सामना जिंकल्यानंतर जडेजा पत्नी रिवाबाजवळ पोहोचला तेव्हा रिवाबाने जडेजाच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला. यानंतर दोघांनी गळाभेट घेत आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर रिवाबा रवींद्र जडेजाच्या पाया पडतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून रिवाबा हिचे कौतूक करत आहे.
सोशल मीडियावर रिवाबाचे सर्वत्र कौतुक
जडेजाची पत्नी रिवाबा ही आमदार आहे. आणि तिने जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर गुजरात विधानसभा निवडणूक लढवली होती. तिचा साधेपणा पाहून सगळेच तिचे कौतुक करत आहेत. रिवाबा हिरव्या रंगाच्या साडीत सिंपल लूकमध्ये दिसली ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. रिवाबाने पती रविंद्र जडेजाच्या पायांना स्पर्श केला आणि नंतर त्याला मिठी मारली, जे पाहून प्रत्येकजण म्हणत आहे की ,रिवाबा आपल्या सनातन धर्माची परंपरा विसरली नाही.
एका चाहत्याने तर त्या क्षणाचा व्हिडीओ शेअर करत “प्रतिष्ठा, संस्कृती, आनंद, स्मितहास्य आणि उत्सव असं कॅप्शन दिलं आहे.
मर्यादा, संस्कार, खुशी, मुस्कान और जश्न…💚 #Rajput @imjadeja#team_CSK #msdhoni #MLARivabaJadeja #RavindraJadeja pic.twitter.com/QUEPEa7jaB
— AJ (@Ajayrajsinh_GDL) May 30, 2023
एका युजरने म्हटले आहे की, “संस्कार आणि चालीरीती तुम्हाला लहान करत नाहीत तर खूप वरचा दर्जा देतात. आम्हाला सर जडेजा आणि त्यांच्या कुटुंबियांचा अभिमान आहे.
एका यूजरने लिहलं आहे की, “त्याच्याबद्दल खूप आदर आहे, एकीकडे लोकांना त्यांच्या परंपरा पाळायला लाज वाटते, तर दुसरीकडे रिवाबा यांचा साधेपणा यांना पाहून आनंद झाला.”
एका यूजरने लिहिले की, “इतिहासात पहिल्यांदा हे बघायला मिळाले. रवींद्र जडेजाच्या पत्नी आणि आमदार असून देखील रिवाबा जडेजा यांनी भारतीय पेहरावात आणि पत्नीचा धर्म पाळत चरणस्पर्श करून आशीर्वाद घेत गळाभेट घेतली.
इतिहास में पहली बार ये देखने को मिला। रविन्द्र जडेजा की धर्मपत्नी भाजपा विधायक माननीया रिवाबा जडेजा भारतीय परिधान में और पत्नि धर्म को पालन करते सर को गले लगाया।@ChennaiIPL @imjadeja @RivabaJadeja @Rivaba4BJP pic.twitter.com/Q15GWU7vpY
— Dr.Balmukund Dwivedi (@l_bhu) May 30, 2023
युजरने लिहिले की, “अष्टपैलू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा सिंग जडेजा (जामनगर आमदार) हिने डोक्यावर स्कार्फ घेऊन पतीच्या पायाला स्पर्श केला आणि विजयासाठी त्याचे अभिनंदन केले! या कृतीतून रिवाबा यांनी महान सनातन धर्माच्या संस्कारांचे आणि संस्कृतीचे जिवंत उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहे.