Ravindra Dhangekar | Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणूक लागल्या असून आता सर्वपक्षाने आपल्या उमेदवारांना रिंगणात उभे केले आहे. त्यातच राज्यातही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे. पुण्यातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाली असून, धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लोकसभेची लढत रंगणार आहे.
धंगेकर हे सध्या कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. गिरीश बापट खासदार झाल्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत नगरसेवक पदावरील धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यात यश मिळवले होते. त्यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव करत आमदारकी मिळविली होती.
पुणे लोकसभा मतदार संघात तिहेरी लढत होणार आहे. मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिन्ही तगडे नेते मानले जात आहे. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होणार आहे.
अश्यातच आज रवींद्र धंगेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे देखील उपस्थित होते. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होत.
‘मीच पुणेकरांच्या हक्काचा उमेदवार अन् पुणेकरच जिंकणार’ – रवींद्र धंगेकर । Ravindra Dhangekar
यावेळी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, “आज सगळ्यात मोठा दिवस आहे. मी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. माझ्यासारख्या साधारण कार्यकर्त्यांला कॉंग्रेसने मोठी संधी दिली आहे. त्यामुळे येणारा काळ रवींद्र धंगेकरचा असेल. मी पुणेकरांचा उमेदवार आहे. पुणेकरांसाठी मत मागत आहे आणि पुणेकरच जिंकणार आहेत.
‘मागील 30 वर्षांपासून पुण्याचे राजकारण जवळून पाहिले आहे. नगरसेवकापासून तर लोकसभेच्या निवडणुकीप्रर्यंत कशाप्रकारे विरोधक यंत्रणेचा वापर करतात हे पाहिले आहे. त्यामुळे वेळ आली की खुल्या मनाने कोणाला किती मते पडणार हे सांगेन.
विरोधकांचे सगळे प्रयोग माझ्या डोळ्यासमोर झाले आहे. त्याचे हे प्रयोग कसे बंद करायचे हे मला माहिती आहे’, असा हल्लाबोल त्यांनी विरोधकांवर केला आहे. । Ravindra Dhangekar