मुंबई – चित्रपटाद्वारे समाजातील सामाजिक विषयांचे चित्र प्रेक्षकांसमोर मांडणारे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक ‘प्रवीण तरडे’ पुन्हा एकदा वेगळा विषय घेऊन आले आहेत.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे ‘हंबीरराव मोहिते’ यांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्रात पसरली आहे. त्यांचा हाच जीवनप्रवास प्रविण तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आणणार आहेत.
18 डिसेंबरला या चित्रपटाचा दमदार असा टिझर प्रदर्शित झाला असून, हा टिझर पाहिल्यावर तुमच्या ही अंगावर शहारे आल्या शिवाय राहणार नाही. फक्त मराठी कलाकारच नाही तर
बॉलिवूड आणि टॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा या चित्रपटाचा टीझर पाहून भारावले आहेत. एकीकडे ‘बाहुबली’ फेम प्रभासच्या पोस्टची चर्चा असतानाच आता बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या मराठीतील ट्विटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
Pravin Tarde आणि टीम सरसेनापती हंबीरराव या मराठीतील भव्य चित्रपटाला शुभेच्छा🙏 Best wishes @WriterPravin and team .. looking forward 😊🙏🏻 pic.twitter.com/sPhpFiXxff
— Raveena Tandon (@TandonRaveena) December 22, 2021
चित्रपटाचा टीझर शेअर करत रवीनाने मराठीत ट्विट केलं आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीने मराठी चित्रपटाला साथ दिल्याने नेटकऱ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. रवीना म्हणते की, “प्रवीण तरडे आणि टीम सरसेनापती हंबीरराव.. या मराठीतील भव्य चित्रपटाला शुभेच्छा..!!’ असं ती म्हणाली आहे.
‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट बिग बजेट असून, मराठीत कधी दिसलं नाही असं काहीतरी, व्हीएफएक्स, भव्यदिव्य सेटने परिपूर्ण असा चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे.
चित्रपटात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत स्वतःहा प्रवीण तरडे असणार आहेत. तर, दुसरीकडे मराठमोळा अभिनेता ‘गश्मीर महाजनी’ हा छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारणार आहे.