मुंबई – अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात अल्लू अर्जुनसह अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत होती. पुष्पा चित्रपटाच्या यशानंतर चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे. यातच आता पुष्पा 2 बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रश्मिका मंदान्नाने चित्रपटाच्या सेटवरील एक खास फोटो शेअर केला आहे.
रश्मिका मंदान्नाने पुष्पा 2: द रुलच्या सेटवरील सुंदर फोटो चाहत्यांना दाखवला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना तिने लिहिले, “#pushpa2” पुष्पा 2: द रुलच्या सेटवरून समोर आलेल्या फोटोत चित्रपटासाठी बंगल्याचा भव्य सेट बनवण्यात आला आहे. रश्मिकाने हा फोटो तिच्या इनस्टा स्टोरीद्वारे शेअर केला होता. या पोस्टनंतर आता चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा 2’ हा चित्रपट जवळपास 500 कोटींच्या बजेटमध्ये बनत आहे. यावेळी अल्लू अर्जुन एक नव्हे तर दोन खलनायकांसोबत शत्रूची भूमिका साकारताना दिसणार आहे. या दोघांशिवाय फहाद फाजिल आणि विजय सेतुपती देखील या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्याने बॉक्स ऑफिसवर प्रचंड खळबळ उडवून दिली होती.