मुंबई – अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या आगामी चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. ‘पुष्पा: द राइज’, ‘वरिसु’, ‘डियर कॉम्रेड’ आणि ‘गुडबाय’ यांसारख्या विविध चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचे प्रदर्शन केल्यानंतर रश्मिकाने आता ‘रेनबो’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे पहिले शेड्युल पूर्ण झाले असून दुसऱ्या शेड्युलबाबतची अपडेट समोर आली आहे.
नॅशनल क्रश ‘रश्मिका’ ही सगळ्यांची आवडती आहे.नुकतंच, रश्मीकाने ‘रेनबो’चे पहिले शेड्यूल ‘कोडाईकनाल’, ‘तामिळनाडू’ येथे पूर्ण केले.आता लवकरच ती रेनबोच्या दुसऱ्या शेड्युलला सुरुवात करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार,”रश्मिका तिच्या तामिळ-तेलुगु चित्रपट ‘रेनबो’ बद्दल खूप उत्सुक आहे. तीच्या या चित्रपटाचे दुसरे शेड्यूल पुढील महिन्यात सुरू होईल.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना या चित्रपटाच्या अपडेटची प्रतीक्षा होती. अखेर आता या चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्युलला सुरुवात होणार आहे. ‘रेनबो’मध्ये रश्मीका ‘देव मोहन’ सोबत दिसणार आहे.या चित्रपटात प्रेक्षकांना रोमँटिक ड्रामा पाहायला मिळणार आहे.
रश्मीकाचा प्रत्येक सिनेमा काहीतरी हटके घेऊन येत असतो. त्यामुळे ‘रेनबो’कडून प्रेक्षकांना चांगल्याच अपेक्षा आहेत. रेनबो’ व्यतिरिक्त, ‘रश्मिका’ कडे तिच्या आगामी लाइन-अपमध्ये काही मोठे प्रोजेक्ट्स आहेत, ज्यात अल्लू अर्जुनसोबतचा पॅन इंडिया ‘पुष्पा 2’ आणि रणबीर कपूरसोबतचा ‘अॅनिमल’ यांचा समावेश आहे.