रश्‍मिका मंदानाने सोडला शाहिदबरोबरचा “जर्सी’

‘अर्जुन रेड्डी’ आणि “कबीर सिंग’नंतर शाहिद कपूर तेलुगू फिल्म ‘जर्सी’ च्या रीमेकमध्ये काम करत आहे. यात शाहिदच्या बरोबर 23 वर्षीय कन्नड अभिनेत्री रश्‍मिका मंदाना दिसणार होती. तथापि, सिनेमाचे कास्टिंग जवळ जवळ फायनल झाल्यानंतर रश्‍मिकाने हा चित्रपट सोडला आहे.

तिच्या जागी ‘सुपर 30’ आणि ‘बाटला हाऊस’ मध्ये काम केलेल्या मृणाल ठाकूरची निवड करण्यात येणार असल्याचे समजले आहे. रश्‍मिकाचा हा बॉलिवूडचा पहिलाच सिनेमा होता. पण निर्मात्यांशी असलेल्या पैशांविषयीचा व्यवहार जमला नाही आणि ती या चित्रपटापासून वेगळी झाली.

या व्यतिरिक्त असेही बोलले जात आहे की निर्मात्यांना पुढील महिन्यापासून चित्रपटाचे शूटिंग सुरू करायचे होते. तर रश्‍मिकाने यापूर्वी साउथच्या एका दुसऱ्या फिल्मला या तारखा दिल्या आहेत. तिच्या जागेवर निवडल्या गेलेल्या मृणालने फरहान अख्तरसोबत ‘तुफान’ या क्रीडापटामध्ये काम केले आहे.

म्हणूनच तिला ‘जर्सी’ ची पटकथाही आवडली आहे. मात्र, अद्याप तिने चित्रपट साइन केलेला नाही. पण ती लवकरच या सिनेमाच्या प्रोजेक्‍टमध्ये सहभागी होऊ शकते असा विश्वास आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.