पुन्हा एकत्रित दिसल्या कंगणा-सोनम

“मी टू’ आंदोलनावेळी कंगणा रणावत आणि सोनम कपूरमधील वादावर खूपच चर्चा झाली होती. त्यावर सोनमने एक ट्विटर पोस्ट करत प्रसार माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने वक्‍तव्य प्रसारीत केल्याचे स्पष्टीकरण दिले होते. आता सोनम आणि कंगणा यांच्यातील वॉरनंतर या दोन्ही अभिनेत्री पुन्हा एकदा एकत्रित आल्या आहेत. चित्रपट निर्माता मधुर भंडारकर यांच्या आगामी चित्रपटात या दोघी काम करत आहेत.

सोशल मीडियावरील एका फोटोत मधुर भंडारकरसोबत सोनम कपूर आणि कंगणा रणावत विमानतळावर पोज देताना दिसतात. कंगणाने पांढ-या रंगाचा, तर सोनमने गडद निळया रंगाचा ड्रेस परिधान केलेला आहे. तसेच तिघांनी सन-ग्लासेसही घातलेले दिसतात.

दरम्यान, सोनम कपूर “द जोया’ या चित्रपटात अखेरच्यावेळी झळकली होती. यात तिच्यसोबत दुलकिर सलमानने काम केले होते. तर कंगणा “थलाइवी’ या बायॉपिकमध्ये झळकणार आहे. हा चित्रपट दिवंगत नेत्या जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.