रश्मिका मंदाना सध्या कामानिमित्ताने मुंबईमध्ये राहते आहे. पण तिच्या घरचे सगळेजण दूर कर्नाटकात विराजपेट इथे आहेत. रश्मिका सध्या बॉलीवूडमधील आपल्या “गुडबाय’ या दुसऱ्या सिनेमाच्या शुूटिंगमध्ये व्यस्त आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून तिने सोशल मीडियावर “डिअर डायरी’ नावाने नियमितपणे लेखन करायला सुरुवात केली आहे. बऱ्याच दिवसात घरच्यांची भेट न झाल्यामुळे तिला आता घरच्यांची आठवण येते आहे.
इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये तिने आपल्य आई-वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्या दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसाबद्दल तिने शुभेच्छाही दिल्या आहेत. या दोघांचा एक फोटोही तिने पोस्ट केला आहे आणि त्यांच्यावर आपले किती प्रेम आहे, हे सांगणारी एक सविस्तर नोटही लिहिली आहे.
लॉकडाऊन उठवल्यापासून रश्मिका एकपाठोपाठ एक सिनेमांचे अर्धवट राहिलेले शुूटिंग पूर्ण करायला लागली आहे. लॉकडाऊन लागू झाला तेव्हा ती घरी परत जाऊ शकली नव्हती. रश्मिका “मिशन मजनू’तून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
याशिवाय “गुडबाय’मध्ये ती अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करणार आहे. याशिवाय अल्लू अर्जुनबरोबर “पुष्पा’मध्ये काम करून ती पॅन इंडिया स्टार होणार आहे.