कामशेत – दुर्मिळ असणाऱ्या रेसल कुकरी प्रजातीचा साप रविवारी शिवणे येथील विठ्ठल विधुर टिळे यांच्या घरात आढळून आला. त्यास सर्पमित्र समाधान शिंदे व शेखर भिवडे यांनी सुरक्षित पकडून जंगलात सोडून दिले.
रेसल कुकरी या प्रजातीच्या सापाच्या अंगावर नक्षीकामा सारखे वैविध्य दिसून येते. सापाच्या डोक्यावर व्ही आकाराची खून असते. विशेष म्हणजे हा साप मानवीवस्ती व जंगलात आढळतो. तो खूप शांत स्वभावाचा आणि लाजाळू साप असल्याने चावत नाही. बिनविषारी आहे. त्यामुळे ही प्रजाती दुर्मिळ झाली आहे.