नवी दिल्ली – ओमायक्रॉन व्हेरियंट जगभरात वेगाने वाढत आहे. आज अमेरिकेत या संसर्गामुळे पहिल्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. भारतात ओमायक्रॉन व्हेरियंट रुग्णांची संख्या 200 वर पोहोचली आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णांची दिल्लीत सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली असून राजधानीत आतापर्यंत 54 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
देशात दिल्ली आणि महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात या नवीन व्हेरियंटची सर्वाधिक 54 जणांना लागण झाली आहे. असे असताना मंगळवारी दिल्लीतही ओमायक्रॉनची लागण झालेले अचानक 24 रुग्ण मिळाले आहेत. यानंतर, दिल्लीतही ओमायक्रॉन संक्रमितांची संख्या 54 झाली आहे.
देशभरात ओमायक्रॉन संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी सकाळी बाधित रुग्णांची संख्या 200 वर पोहोचली आहे. सोमवारपर्यंत देशात 174 ओमायक्रॉन होते. देशाची राजधानी दिल्ली येथे सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्रानंतर दिल्लीतही एकूण बाधितांची संख्या 54 वर पोहोचली आहे. तर, सोमवारपर्यंत येथे 30 ओमायक्रॉनचे रुग्ण होती.