Idley Pride, Star Blazers 2202 आणि Convenience Store Boyfriends मधील व्हॉईस-ओव्हरसाठी प्रसिद्ध असलेली जपानी अभिनेत्री सायाका कांडा हीचे निधन झाले आहे. तिच्या अधिकृत वेबसाइटवर मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. 35 वर्षीय अभिनेत्री हॉटेलच्या 22व्या मजल्यावरून पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांना आत्महत्येचा संशय आहे. याशिवाय कट असण्याची शक्यताही पोलिसांनी नाकारली नाही.
सायकाच्या टीममधून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अभिनेत्री सायाका कांडा अपघाताची शिकार झाली आहे. अभिनेत्रीचे 18 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता अचानक निधन झाले. त्याच्या चाहत्यांना अशी बातमी देताना आम्हाला खूप दुःख होत आहे. या बातमीवर विश्वास ठेवणे आमच्यासाठीही कठीण होत आहे. पण सायाका आता आपल्यात नाही हे मात्र खरे आहे.
रिपोर्ट्सनुसार, सायाका हॉटेलच्या बाहेर रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तिची खोली 22 व्या मजल्यावर होती आणि तिथून ती खाली पडल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेत्रीला रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिली मृत घोषीत केले. पोलिस सध्या याला आत्महत्येचे प्रकरण मानत आहेत मात्र सायकाच्या मित्रांनी ती आत्महत्या करू शकत नसल्याचे सांगितले आहे.