Ranji Trophy Final, Mushir Khan’s century : सर्फराज खानने भारतीय क्रिकेट संघात पदार्पण करताना आश्चर्यकारक कामगिरी केली. दुसरीकडे त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. मुंबई आणि विदर्भ यांच्यात खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुशीर खानने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. मुंबईचा डाव सांभाळताना मुशीरने प्रथम श्रेणीतील दुसरे शतक पूर्ण केले. या शतकासह त्याने सचिन तेंडुलकरचा 29 वर्ष जुना विक्रमही मोडला. यादरम्यान, अंतिम सामना पाहण्यासाठी सचिन तेंडुलकर तिसऱ्या दिवशी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होता.
Mumbai displayed a lot more discipline, patience and commitment in the second innings.
First, a crucial partnership between @ajinkyarahane88 and Musheer Khan put Mumbai in a solid position. Then, Musheer’s stand with @ShreyasIyer15 has taken the game further away from Vidarbha.… pic.twitter.com/pq76C421mO
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 12, 2024
मुशीरची शतकी खेळी….
रणजी फायनलच्या तिसऱ्या दिवशी मुंबईचा फलंदाज मुशीर खानने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. मात्र, तो आपला डाव 136 धावांच्या पुढे नेऊ शकला नाही आणि एलबीडब्ल्यू आऊट झाला. या खेळीत त्याने 10 चौकार मारले. मुशीरच्या शतकामुळे मुंबई संघ चांगल्या स्थितीत पोहोचला आहे. मुशीरचे फर्स्ट क्लास कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने याच रणजी मोसमात उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातही शतक झळकावले होते.
Tea on Day 3!
Musheer Khan departs on the stroke of tea for 136. Mumbai extend their lead to 476.
Vidarbha took 3 wickets in the afternoon session. Mumbai scored 95 runs.#RanjiTrophy | @IDFCFIRSTBank | #Final | #MUMvVID
Follow the match ▶️ https://t.co/k7JhkLhOID pic.twitter.com/oEREbPZbNE
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 12, 2024
मोडला तेंडुलकरचा 29 वर्षे जूना विक्रम ..
या शतकासह मुशीर रणजी ट्रॉफी फायनलमध्ये शतक झळकावणारा मुंबईचा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने महान सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. मुशीरने वयाच्या 19 वर्षे 14 दिवसांत ही कामगिरी केली आहे, तर सचिनने त्याच्या 22 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी फायनलमध्ये शतक झळकावले होते. 1994/95 च्या मोसमात पंजाबविरुद्ध दोन शतके झळकावून अंतिम सामन्यात शतक झळकावणारा मुंबईचा सर्वात तरुण फलंदाज होण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनच्या या शतकांच्या जोरावर मुंबईने स्पर्धेची अंतिम फेरी जिंकली होती.
Team India : यशस्वी जैस्वालला ICC कडून मोठा पुरस्कार, केन विल्यमसन आणि पाथुम निसांकाला टाकले मागे…
मुशीर आहे जबरदस्त फॉर्मात…
मुशीर खान सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने अंडर-19 विश्वचषकात सुमारे 60 च्या सरासरीने 360 धावा केल्या, ज्यामध्ये दोन शतकांचाही समावेश आहे. यानंतर त्याने रणजी उपांत्यपूर्व फेरीत 203 धावांची नाबाद खेळी खेळली. एवढेच नाही तर या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुशीरने अर्धशतक झळकावले होते. त्याच वेळी, आता अंतिम सामन्यात त्याने 136 धावांची इनिंग खेळली. या रणजी हंगामात मुशीरने 100 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 433 धावा केल्या आहेत.