बॉलीवूडमधील भाईजान अर्थात सलमान खान याचा बहुप्रतीक्षित “राधे’ चित्रपटाचे काम सुरू करत अभिनेते रणदीप हुड्डा याने पुन्हा वापसी केली आहे. रणदीपने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत तो एका माइक्रोफोनच्या मागे उभा असलेला दिसत आहे. हा फोटो कोणत्या तरी डबिंग सेशनचा असल्याचे दिसते.
या फोटोसह रणदीपने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, लॉकडाउननंतर पुन्हा कामावर वापसी केल्याने सर्वांचे आभारी आहे. हॅशटॅगराधे. “किक’ आणि “सुलतान’नंतर रणदीप पुन्हा एकदा सलमान खानसोबत मोठया पडद्यावर झळकणार आहे. या दोघांमधील जुगलबंदी पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच रोमांचित आहे.
हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
याला हजारोंच्या संख्येने लाइक्स् मिळाले असून अनेक जण कमेंट करत आहे. एकाने कमेंट करत पोस्ट केले की, हा चित्रपट पाहण्यासाठी मी खूपच रोमांचित आहे. मेगास्टार सलमान खानसोबत आपला चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण हरियाणा प्रतीक्षेत आहे. अन्य एकाने लिहिले की, मोठया पडद्यावर सलमान खान आणि आपल्याला पाहण्यासाठी आता जास्त प्रतीक्षा करू शकत नाही. “राधे’ची आतापासूनच उत्सुकता लागली आहे.