मुंबई – बॉलिवूडमधील अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा या कपलची कोणत्या न कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चा रंगलेली असते. अनेकदा ते दोघे एकत्र फिरताना दिसतात. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असून अनेक फोटो ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतेच मलायकाने अर्जुनचा कपूरचा एक सेमी न्यूड फोटो शेअर केला आहे.
मलायकाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये अर्जुन कपूरने कपडे परिधान केलेले नाही. या फोटोमध्ये तो निवांत हात-पाय पसरून सोफ्यावर बसलेला दिसतो. त्याचे शरीर त्याने उशीच्या मदतीने झाकले आहे. हा फोटो शेअर करत मलायकाने ‘माय व्हेरी ओन लेझी बॉय’ असे कॅप्शन दिले आहे. मात्र हा फोटो शेअर केल्याने मलायकाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
‘किमान मुलाचा तरी विचार करायचा,’ ‘सोशल मीडियावर असे फोटो का पोस्ट करावे’ ‘हे फोटो शेअर करून काय मिळते’, असे सवाल नेटकरी करत आहेत. दरम्यान, मलायका आणि अर्जुन गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांच्या वयात 12 वर्षांचे अंतर असल्याने यावरून देखील त्यांना अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे.
अर्जुन कपूर नुकताच ‘कुत्ते’ चित्रपटात दिसला होता. आता तो लवकरच ‘द लेडी किलर’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो ‘मेरे पति की बीवी’मध्ये देखील काम करणार आहे. तर नुकतंच मलायकाचं नवीन गाणे ‘तेरा की ख्याल’ रिलीज झाले. यामध्ये ती गुरु रंधावासोबत दिसली होती.