सध्या वेबसिरीजचा जमाना आहे. एक नवी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “रामयुग’ असे या वेबसिरीजचे नाव असून या वेबसिरीजचा टीझर रिलीज केला आहे. यात रामायणची कहाणी नव्या रूपात प्रेक्षकांपुढे येणार आहे. रामयुग वेबसिरीज एमएक्स ओरीजिनल सिरीजवर येणार आहे.
कुणाल कोहली हे या वेबसिरीजचे दिग्दर्शक आहेत. या वेबसिरीजचा ट्रेलर 29 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. कुणाल कोहली या वेबसिरीजबद्दल खूप उत्साही आहे.
सध्या बॉलीवूडमध्ये प्रभू श्रीरामांच्या जीवनाविषयी अनेक चित्रपट बनले जात आहेत. यामध्ये प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटाचा समावेश आहे. तसेच रामसेतु या चित्रपटात अभिनेता अक्षयकुमार मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रभू श्रीराम यांच्या चरित्रातूनही हा चित्रपट प्रेरित आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण अयोध्येत करण्यात आले.