काठमांडू (नेपाळ) – नेपाळची राजधानी काठमांडू, तसेच बीरगंज, पीरगंज आणि अन्य शहरांमध्ये हिंदूंकडून भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात आले. यात हजारो हिंदूंनी भाग घेतला. या वेळी हिंदूंनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही केली.
श्रद्धास्थानांचा अवमान होत असतांना आम्ही गप्प बसू शकत नाही. यापूर्वीही हिंदूंना शिवीगाळ करण्यात आली आहे. आता पाकमध्ये हिंदूंचे मंदिर पाडण्यात आले.
भारतात कट्टरवाद्यांनी हिंसाचार केला. याविरोधात आम्ही शांततेत मोर्चा काढून आमच्या धर्माचे रक्षण करत आहोत. यातही काही जिहादी अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत.’ असे या मोर्च्यात सहभागी झालेल्यांनी म्हटले आहे.