कोलकाता – संपूर्ण देशात कोरोनाची भयंकर लाट आहे. पश्चिम बंगालमधील स्थिती मात्र चिंताजनक बनली आहे. राजधानी कोलकातामध्ये आरटीपीसीआर तपासणी करणारा प्रत्येकी दुसरा व्यक्ती महामारीने बाधित आढळून येत आहे. उर्वरित राज्यांत प्रत्येकी चारपैकी एक नमूना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. हे प्रमाण एका महिन्यात पाचपटीने वाढले आहे. कोलकाता व परिसरातील प्रयोगशाळांतील आकडे ४५ टक्के ५५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट सांगू लागल्या आहेत. राज्यातील दुसऱ्या भागात हे प्रमाण सुमारे २४ टक्के आहे.
उत्तर प्रदेशचे माजी पाेलिस महासंचालक विक्रम सिंह म्हणाले, आम्ही एक महिन्यापूर्वी आयाेगाला नाेटीस पाठवली हाेती. बंगालमध्ये काेविड प्राेटाेकाॅलचे उल्लंघन केले जात आहे, असे निदर्शनास आणून दिले हाेते. जाहीर सभांवर बंदी घाला अशी मागणी आम्ही तेव्हा केली हाेती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आयाेगाने याेग्यवेळी पावले उचलली असती तर ही वेळ आली नसती.
महिन्याच्या सुरूवातीच्या तुलनेत हे प्रमाण ५ टक्क्यांनी जास्त आहे. एका सरकारी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पॉझिटिव्हीटी रेट यापेक्षा जास्त आहे. लक्षण नसलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. असे लोक तपासणी करत नसल्याचे समोर आले आहे. बंगालमध्ये ८ टप्प्यात विधानसभा निवडणूक होत आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदान २७ मार्चला झाले. सोमवारी ७ व्या आणि २९ एप्रिलला ८ व्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. तृणमूलसह अनेक पक्षांनी अखेरच्या तीन टप्प्यांसाठी एकाचवेळी मतदानाची मागणी केली होती. परंतु निवडणूक आयोगाने ती नाकारली.