मुंबई – हिंदी आणि तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘रकुलप्रीत सिंह’ आपल्या ग्लॅमर आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. रकुलने १० जानेवारी २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर रकुलप्रीतने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे.
मात्र, रकुलचा शेवटचा चित्रपट ‘थँक गॉड’ हा होता. त्यानंतर अभिनेत्रीचा अद्याप कोणताच चित्रपट रुपेरी पडद्यावर आला नाही. थँक गॉड या चित्रपटामध्ये रकुल प्रीत सिंहसोबत अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा देखील मुख्य भूमिकेत होते.
दरम्यान, नुकतंच अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत आगामी चित्रपटाची शूटिंग सुरु केली असल्याचं सांगितलं आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये रकुल प्रीत सिंहने टाॅवेल गुंडाळलेला दिसतोय. हा फोटो पाहून सुरूवातीला वाटते की, रकुलला थंडी प्रचंड लागत आहे.
रकुल हिने हा फोटो शेअर करताना या फोटोमध्ये तिने टाॅवेल नेमकी काय गुंडाळली आहे? याचे कारणही सांगून टाकले आहे. आगामी चित्रपटाच्या एका सीनसाठी रकुल ही तब्बल ११ तास पाण्यामध्ये राहिली होती. पाण्यातील शूटिंग पूर्ण करून आल्यावर थंडी वाजत असल्याने रकुल हिने टाॅवेल गुंडाळला आहे.
इतकेच नाहीतर कोणीतरी दिला आैषध देताना देखील दिसत आहे. रकुल हिने हा फोटो शेअर करताना लिहिले की, ‘हा माझ्या आयुष्यामधील सर्वात कठिण सीन होता’. असं देखील सांगितलं आहे.
सध्या अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, फॅन्स देखील तिच्या या फोटोंवर कमेंटवर करत आहेत. रकुलप्रीत ही बॉलिवूडमधील एक आघाडीची नायिका असून, फॅन्सच्या मनात तिने आपले स्थान निर्माण केले आहे.