राखी सावंतने शेअर केला पतीचा फोटो; तुम्ही पहिला का?

ड्रामा क्‍वीन राखी सावंत वेगवेगळ्या वादातून मुक्त होत नाही. राखी सावंत सध्या तिच्या सिक्रेट लग्नाविविषयी चर्चेत आहे. मध्यंतरी राखीच्या घटस्फोटापासून तिच्या प्रेंग्नंसीपर्यंत अनेक अफवा पसरल्या होत्या. परंतु, राखीने सोशल मीडियावर आपल्या नवऱ्याचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे.

रितेश एच नावाच्या एनआरआयशी राखीने लग्न केल्याचे म्हंटले होते. अनेक दिवसांपासून माध्यमांपासून दूर असलेल्या पतीचा फोटो राखीने शेअर केला. परंतु, यासोबतच तिने एक अटही ठेवली आहे. यामध्ये राखीने नऊ मुलांचे फोटो पोस्ट केले आहेत. आणि यामधील कोणता तिचा पती आहे हे चाहत्यांना ओळखण्यास सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

Konsa Mera husband hai

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

दरम्यान, राखी सावंतने २८ जुलैला मुंबईतल्या जे.डब्लू मेरियटमध्ये एका एनआरआयबरोबर गुपचूप लग्न केल्याची बातमीही अशीच पसरली होती. या बातमीस तिने स्वता:नेही दुजोरा दिला होता. राखी आपल्या पतीसमवेत लवकरच बिग बॉस सीझन १३ मध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याची बातमी सध्या सोशल मीडियामध्ये ट्रेंड होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.