श्रीगोंदा – 226 श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघासाठी आज पहिल्याच दिवशी तब्बल 17 जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. आजपासून निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. निवडणूक शाखेतून मिळालेली माहितीनुसार दुपारी 2:30 वा पर्यंत बंडोपंत धारकर (अपक्ष), राजेंद्र निळकंठ नागवडे (आप), राजेंद्र राऊत (संभाजी ब्रिगेड), टिळक भोस (संभाजी ब्रिगेड व एक अपक्ष ), मनोज मैड (मनसे), कांतीलाल कोकाटे (वंचित आघाडी), धर्मेंद्र दिवे, गुलाब रणसिंग, राजाराम जठार, ज्ञानदेव शिरवाळे, सुनील उदमले, रत्नमाला ठुबे, विजय उंडे, बाळासाहेब झगडे, अनिल तुपे, मंगेश घोडके (सर्व अपक्ष) यांनी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज नेले आहे.