मुंबई – राखी सावंतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिचा प्रियकर आदिल दुर्रानीसोबत तिने गुपचूप लग्न केल्याचा दावा केला जात आहे. राखी लाल रंगाचा सलवार-सूट परिधान करून प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करत असल्याचे एका फोटोत दिसत आहे. काळ्या शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये आदिल तिच्या शेजारी बसला आहे. दुसऱ्या चित्रात दोघांनी गळ्यात हार घातले आहेत. आणि लग्नाचा दाखला हातात घेतला आहे. राखी आणि आदिल काही काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही हे नाते लपवत नाहीत. आदिलने काही मुलाखतींमध्ये असेही सांगितले होते की, तो हळूहळू आपल्या आई-वडिलांना समजवण्याचा प्रयत्न करत आहे.
राखी सावंत आणि आदिल दुर्राणी यांच्यातील नात्याची सर्वांनाच कल्पना आहे. आता दोघांच्या गुप्त लग्नाच्या बातम्याही येत आहेत. सोशल मीडियावर काही फोटो लीक झाले आहेत, ज्यात राखी आणि आदिल कोर्ट मॅरेज करताना दिसत आहेत. यापूर्वी राखीने रितेश सिंगसोबत लग्न केले होते. राखीने रितेशचा कोणताही फोटो शेअर केलेला नाही. त्याचा परिचय थेट बिग बॉसमध्ये झाला होता. बिग बॉस सोडल्यानंतर राखी आणि रितेश वेगळे झाले. रितेश आधीच विवाहित होता आणि एका मुलाचा बाप होता. राखीने सांगितले की, रितेशने ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली होती.
बराच काळ होते एकत्र –
रितेशपासून वेगळे झाल्यानंतर राखी आदिलसोबत दिसू लागली. यानंतर दोघांनीही आपण कपल असल्याचे मान्य केले. आदिल मुस्लिम धर्माचा आहे. राखीसोबत लग्न करणार असल्याचे त्याने सांगितले होते, मात्र घरच्यांना त्याची समजूत घालावी लागेल. आता आदिल आणि राखीने गुपचूप लग्न केल्याच्या बातम्या येत आहेत. कोर्टातून ही छायाचित्रे लीक झाली आहेत.
राखीच्या आईला ब्रेन ट्युमर –
राखीने नुकताच एक व्हिडिओ शेअर करून तिच्या आईला ब्रेन ट्युमर झाल्याची माहिती दिली होती. यापूर्वी राखीच्या आईला कॅन्सर झाला होता. त्यावेळी सलमान खानने तीला उपचारात मदत केली. राखी नुकतीच बिग बॉस मराठीतून बाहेर आली आहे.