पुणे – महाराष्ट्र सरकारच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) राज्य सल्लागार समितीची नुकतीच फेररचना करण्यात आली. यात अशासकीय सदस्यपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालयांतील “एनएसएस’चे कामकाज अधिक कार्यक्षम पद्धतीने व्हावे, म्हणून ही समिती काम करते. दर तीन वर्षांनी या समितीची फेररचना करण्यात येते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंसह “एनएसएस’चे कार्यक्रम अधिकारी यांचा समावेश असतो. समितीत अशासकीय सदस्य म्हणून पांडे यांच्यासह राज्याचे माजी संपर्क अधिकारी डॉ. प्रमोद पाब्रेकर, औरंगाबाद विद्यापीठाचे किशोर शितोळे, नागपूर विद्यापीठाचे डॉ. सतीश चापले यांचाही समावेश आहे.
कोट
ही निवड म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या माध्यमातून केलेल्या कामाची पावती आहे. एनएसएसमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक संवेदनशीलता वाढते. राज्यात चार लाख एनएसएस विद्यार्थ्यांचे नेटवर्क आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना समाजामिभुख कार्य करण्यासाठी हे चांगले व्यासपीठ आहे. यातून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा प्रयत्न राहील.
राजेश पांडे, सदस्य, एनएसएस राज्य सल्लागार समिती