नवी दिल्ली – प्रसिद्ध पत्रकार रजत शर्मा यांनी आज दिल्ली व जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (डीडीसीए) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. रजत शर्मा यांच्या राजीनाम्याची माहिती डीडीसीएच्या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. गेल्या वर्षी जुलै 2018 मध्ये डीडीसीएचे अध्यक्ष म्हणून रजत शर्मा यांची निवड करण्यात आली होती.
News alert: @RajatSharmaLive has tendered his resignation from the post of President, DDCA with immediate effect and forwarded it to the Apex Council.
— DDCA (@delhi_cricket) November 16, 2019
दरम्यान, राजीनामा पाठवताना रजत शर्मा म्हणाले, प्रिय सभासदांनो, डीडीसीएचे अध्यक्ष असताना माझ्या कार्यकाळात माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. माझ्या छोट्या कार्यकाळात माझा सत्याचा आणि प्रामाणिकपणाचा संबंध आहे. आपल्या जबाबदाऱ्या समाजाच्या हिताच्या दृष्टीने पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. आमचा एकमेव अजेंडा असोसिएशनचे आणि प्रत्येक पैलूचे कल्याण आहे. असं शर्मा म्हणाले.
यहाँ काम करना आसान नहीं था. लेकिन आपके विश्वास ने मुझे ताक़त दी. आज मैंने डीडीसीए का अध्यक्ष पद छोड़ने का फ़ैसला किया है और अपना इस्तीफ़ा एपेक्स काउंसिल को भेज दिया है. आपने जो प्यार और सम्मान मुझे दिया है उसके लिए आपका आभार: रजत शर्मा. https://t.co/D3CxdgFynN
— Rajat Sharma (@RajatSharmaLive) November 16, 2019