Raj Thackeray : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची डेडलाइन दिली आहे.
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता जरांगे पाटील (manoj jarange patil) पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. कालपासून (१५ नोव्हेंबर) त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली असून, आज ते आज पुणे जिल्ह्यातील दौंड गावात आहे.
दरम्यान, राज्यात मनोज जरांगे पाटील त्यांचा दौरा सुरु असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS Raj Thackeray) एक मोठं विधान केल्याचं पाहायला मिळालं आहे.
मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी अनेक विषयावर आपली मत मांडली. सरकारवरही त्यांनी टीकेची तोफ डागली.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मनोज जरांगे यांना भेटून सांगितलं होतं असं कोणतंच आरक्षण कधीही मिळणार नाही. हे मी मनोज जरांगे पाटील यांना आधीच सांगितले आहे.
मुळात त्यांच्या मागे कोण आहे, कोण बोलायला सांगत आहेत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव होत आहेत, हे लवकरच समोर येईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.