नवी दिल्ली – मसने अध्यक्ष राज ठाकरे यांना येत्या १८ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बिहारच्या रांची येथील न्यायालयात राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून राज यांच्यावर छठपुजेप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, राज यांच्याविरोधात यापूर्वीच न्यायालयाने नोटीस जारी केली होती. मात्र राज यांच्याकडून न्यायालयाच्या नोटिशीला कोणतेही उत्तर मिळाले नाही. ‘छठपुजा म्हणजे केवळ नाटक असते’ असे राज ठाकरे म्हणाले होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे आपल्या मनावर आघात झाल्याचे याचिकाकर्त्यांने म्हंटले आहे.