प्रतिनिधी उदयकांत ब्राम्हणे
कोरेगाव भीमा – पेरणे फाटा ( ता.हवेली) येथील २०५ व्या जयस्तंभ अभिवादन सोहळ्यास शिवसेना नेत्या सुषमा अंधारे अभिवादन करण्यासाठी आल्या होत्या.यावेळी त्यांनी जयस्तंभ येथे अभिवादन करून नवीन वर्षाची सुरुवात ही एका ऊर्जादयी दिवसाने केली आहे
करनी सेनेबाबत विचारले असता करणी सेनेसारख्या चिल्लर लोकांवर मी काही बोलणार नाही पण यांचे जे बोल विके धनी आहेत त्या भाजप मधल्या कोणत्याही नेत्याने हे बोलून दाखवले मग त्यांना आंबेडकरी जनता काय आहे हे दाखवून देवू सत्तेतील कोणतेही नेते येथे येणे अपेक्षित नाही ,ज्या पेशवाईचा पाढा म्हणून हा विजय स्तंभ उभारला गेला त्याच पेशवाईचा वसा आणि वारसा चालविणारे लोक या सरकारमध्ये आहेत ते अभिवादन करायला येथे येतील का ही अपेक्षाही आम्ही करत नाही असे सुषमा अंधारे यांनी सांगितले.
यावरही करण्यात आलेल्या सेवा सुविधांविषयी साधन व्यक्त करत बस थांबा खूप लांब असून अनुयायांना खूप लांब पायी लांब पायी चालत यावे लागते सुरक्षेच्या नावाखाली लोकांनीं गैरसोय होत आहे.शासनाचे इतर नियोजन सुंदर आहे.
ज्या पेशवाईचा पाढा म्हणून हा विजय स्तंभ उभारला गेला त्याच पेशवाईचा वसा आणि वारसा चालविणारे लोक या सरकारमध्ये आहेत ते अभिवादन करायला येथे येतील का ही अपेक्षाही आम्ही करत नाही – शिवसेना नेत्या सुषमा अंधारे