‘या’ क्लासचा रेल्वे प्रवास महागणार

नवी दिल्ली- लाॅकडाऊनचा फटका सगळ्या क्षेत्राला बसला आहे. त्याचा परिणाम अनेक क्षेत्र आता भरुन काढण्याच्या तयारीत आहे. त्यात महत्वाचं म्हणजे आता रेल्वेकडूनही काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. रेल्वे प्रवास महागणार आहे.

एसी 1मध्ये प्रवास करणा-यांना युजर फी म्हणून 30 रुपये द्यावे लागतील. एसी 2 आणि एसी 3मध्ये प्रवास करणार्‍यांसाठी यूजर फी कमी असेल, तर स्लीपर क्लासमधील प्रवाशांसाठी तो माफक असेल.

आरक्षित नसलेल्या प्रवर्गातून आणि उपनगरी रेल्वे प्रवाशांकडून किमान यूजर फी गोळा करावी की त्यापासून मुक्त राहावे यावर चर्चा आहे. रेल्वे मंत्रालयाने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी केलेल्या प्रस्तावानुसार प्रवाशाला यूजर फी द्यावी लागेल. तसेच जर तुम्ही रेल्वे स्थानकात एखाद्यास सोडण्यासाठी गेला असाल तर तुम्हाला प्लॅटफॉर्मच्या तिकिटाव्यतिरिक्त अभ्यागत फी देखील भरावी लागेल.

यूजर फीमुळे सामान्य प्रवाशांना कोणतीही अडचण होणार नाही. पुढील महिन्यात यूजर फीबाबत अधिसूचना जारी केली जाऊ शकते. नवी दिल्ली रेल्वे स्थानक आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या पुनर्विकासासाठी खासगी कंपन्यांकडून निविदा स्वीकारण्याची अंतिम तारीख रेल्वेने 6 नोव्हेंबरपर्यंत निश्चित केली आहे, असं रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.