राहू,(वार्ताहर)- येथे शंभू महादेव प्रतिष्ठान आयोजित नमो चषक २०२४ लीगच्या निमित्ताने दौंड तालुक्यातील राजकीय पुढारी विरुद्ध पत्रकार या मैत्रीपूर्ण सामन्यामध्ये पत्रकारांनी राजकीय पुढाऱ्यांच्या संघावर मात केली.
राजकीय संघाकडून आमदार राहुल कुल यांच्यासह हरिभाऊ ठोंबरे ,जयदीप सोडनवर, किरण देशमुख, विकास सोनवणे, युवराज शेंडगे, सुखदेव चोरमले, रवींद्र ढमढेरे, दिनेश भुजबळ, अशोक हंडाळ, गणेश गायकवाड आदींनी सहभाग नोंदविला.
पत्रकार संघामध्ये रमेश वत्रे, विशाल धुमाळ, संदीप सोनवणे, रवींद्र खोरकर, संदीप नवले, अमर परदेशी, प्रकाश शेलार, वाजीद बागवान, संतोष काळे, निलेश जांबले, अतुल बोराटे, जीवन शेंडकर, सचिन आव्हाड, सुमित सोनवणे, नरेंद्र जगताप आदींनी सहभाग घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजकीय पुढारी संघाने निर्धारित पाच शतकामध्ये ५६ धावा केल्या. या धावाचे आव्हान पार करताना पत्रकार संघाने सहा गडी राखून विजय खेचून आणला. आमदार राहुल कुल यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली तर पत्रकार संघातर्फे संदीप सोनवणे यांनी नाबाद 22 धावांची खेळी केली.
मैत्रीपूर्ण लढतीतील विजयाबद्दल बोलताना आमदार राहुल कुल यांनी सांगितले की, खेळामध्ये हारजीत महत्त्वाची नसून शारीरिक फिटनेस गरजेचा आहे. 29 वर्षांपासून अतिशय सुंदररित्या पार पडत असलेल्या या स्पर्धेनंतर भविष्यात लेदर बाॅलवर स्पर्धा आयोजित करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.