पुणे : कसबा विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 17 रविवार पेठ रस्ता पेठ येथे दि.13 रोजी सायंकाळी पदयात्रा आयोजित करण्यात आली. कामगार मैदान येथून सुरू झालेल्या या पदयात्रेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व मित्रपक्षांचे शेकडो कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.
धंगेकर यांचे बॅनर व पोस्टर्स यासह फटाक्यांच्या आतिशबाजीसह निघालेल्या या पदयात्रेत तीनही पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते.
यावेळी उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासमवेत कॉंग्रेस पक्षाचे वीरेंद्र किराड, लता राजगुरू, वैशाली मराठे, कैलास गायकवाड, राजू शेख, संदीप आटपळकर, राजेंद्र पडवळ, सुरेश कांबळे,
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवीण तरवडे, गणेश नलावडे, वनिता जगताप, बाळासाहेब ढमाले, अभिजित घाडगे, देवेंद्र देशकर, शिवसेना पक्षाचे पल्लवी जावळे, विशाल धनवडे, जावेद खान, युवराज पारिख, राजेंद्र शिंदे, संतोष भुतकर,मुकुंद चव्हाण, योगेश खेंगरे, भाऊ शिंदे, योगेश येनपुरे, उमेश बोर्डे आदि प्रमुख कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.
ही पदयात्रा रास्तापेठ व रविवार पेठ या दाट वस्तीतून जात राहिली तेंव्हा ठिकठिकाणी नागरिकांनी दुतर्फा उभे राहून त्यांचे स्वागत केले. प्रमुख गणेश मंडळांच्या गणपतीची धंगेकर यांनी आरती केली.
तर, व्यापाऱ्यांनीदेखील ठिकठिकाणी धंगेकर यांचे स्वागत केले. पदयात्रेत तरुण व महिलांचा मोठा सहभाग होता. सुमारे 4 तास चाललेली ही पदयात्रा जोगोबा दादा तालीम येथे संपली.