पुणे : सेंट मीरा महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. सुवर्णा देवळाणकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे.
डॉ. देवळाणकर यांनी “Analysis of the Effectiveness of physical Activity Awareness model to mold Exercise Behavior of Junior College Girls” या विषयावरील शोध प्रबंध विद्यापीठास सादर केला होता.
या प्रबंधाच्या मौखिक चाचणीसाठी रविशंकर विद्यापीठ, रायपूरचे प्रा. डॉ. सोपान, पुणे विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. दीपक माने हे उपस्थित होते.
डॉ. देवळाणकर यांनी चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय या केंद्रातून डॉ. अमित प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली आपला प्रबंध पूर्ण केला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल सेंट मीरा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जया राजगोपालन, चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान कांगणे, महाराष्ट्रीय मंडळाच्या प्रमुख नेहा दामले, डॉ. महेश देशपांडे, डॉ. शरद अहेर, डॉ. आनंद लुंकड यांनी अभिनंदन केले आहे.