डेहराडून – उत्तराखंडचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून आज भाजपचे पुषरसिंग धामी यांनी शपथ घेतली. त्यांच्यासमवेत अन्य 11 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल बेबी रानी मौर्य यांनी राजभवनाच्या प्रांगणामध्ये आयोजित एक साध्या समारंभामध्ये धामी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला पद आणि गोपनियतेची शपथ दिली.या प्रसंगी उत्तराखंडमधीन सत्तारुढ भाजपचे खासदार आणि आमदारांसह वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.
धामी यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोणीही नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. पूर्वीचे मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत यांच्या सरकारमधील मंत्रिमंडळ तसेच कायम ठेवण्यात आले आहे. मात्र यावेळी सर्व मंत्र्यांना कॅबिनेट दर्जा देण्यात आला आहे. गेल्या मंत्रिमंडळातील रेखा आर्य, धन सिंग रावत आणि यतिश्वरानंद यांना कॅबिनेट मंत्रिपदावर बढती देण्यात आली आहे.
45 वर्षीय धामी हे उत्तराखंडचे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंग कोश्यारी यांचे ते निकटवर्तीय असल्याचे मानले जाते आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते सतपाल महाराज आणि अन्य काही आमदार नाराज असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी धामी यांनी सतपाल महाराजांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. नवीन मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत जे नारेज होते, असे बोलले जात होते, ते सर्वजण शपथविधीला उपस्थित होते आणि त्यासर्वांना मंत्रीपद दिले गेले आहे. पक्षामध्ये कोणतीही नाराजी नेसल्याचे स्पष्टिकरण धामी यांनी नंतर दिले.