मुंबई – पंजाब किंग्जचा सलामीवीर शिखर धवन याने यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील आपला कारकिर्दीतील 200 वा सामना खेळत एक विक्रम साकार केला. तसेच त्याने आयपीएल स्पर्धेत आजवरच्या कारकिर्दीत सहा हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. आयपीएल स्पर्धेत 200 सामने खेळणारा धवन आठवा खेळाडू ठरला आहे.
सर्वाधिक सामने खेळणारा चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी प्रथम क्रमांकावर असून, त्याने आतापर्यंत 228 सामने खेळले आहेत. रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर 6 हजार 402 धावा असून, तो प्रथम क्रमांकावर आहे. रोहित शर्मा तिसऱ्या, तर डेव्हिड वॉर्नर चौथ्या स्थानावर आहे.