बंगळुरू – प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटणने हरयाणा स्टीलर्सचा 45-27 असा पराभव करत विजय नोंदवला. पुणेरी पलटणच्या शानदार विजयाने त्यांच्या प्लेऑफच्या आशा अजूनही जिवंत आहेत. हरयाणा स्टीलर्सचा 19 सामन्यांतील हा सातवा पराभव असून ते तिसऱ्या स्थानावर आहेत.
पूर्वार्धानंतर पुणेरी पलटणचा संघ 26-7 असा पुढे होता. हरयाणा स्टीलर्सने सामन्याच्या सहाव्या मिनिटाला पुणेरी पलटणला सर्वबाद करून जबरदस्त आघाडी घेतली होती. हे सत्र संपण्यापूर्वी पलटणने पुन्हा एकदा हरयाणा स्टीलर्सला ऑलआऊट केले आणि पहिल्या 20 मिनिटांतच सामना जवळपास एकतर्फी केला.
दुसऱ्या सामन्यात परदीप नरवालच्या 3 सुपर रेडच्या जोरावर यूपी योद्धाने जयपूर पिंक पॅंथर्सला 41-34 असे पराभूत केले. या विजयासह यूपीचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी तर जयपूरचा संघ सहाव्या स्थानी आहे.