पुणे – जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदाच्या भरतीसाठीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार या परीक्षांना जूनपासून सुरुवात होणार आहे.
जिल्हा परिषदेची भरती अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. परीक्षा या लवकरात-लवकर घेण्यात याव्यात, पण उमेदवारांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल, यादृष्टीने किमान ३० दिवस आधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणीही उमेदवारांच्या वतीने करण्यात आली होती.
दरम्यान, ग्रामसेवक, आरोग्यसेवक पदांच्या हजारो रिक्त जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. चार महिन्यांपासून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत होते. त्यानंतर ग्रामविकास विभागाकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे अनेक महिन्यांपासून रखडलेली ही भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता उमेदवारांना परीक्षेची तयारी करणे शक्य होणार आहे.
असे आहे परीक्षेचे वेळापत्रक
आरोग्य सेवक पुरुष- १० ते १२ जून
सहाय्यक परिचारिका – १६ जून
ग्रामसेवक – १६ ते २१ जून