पुणे : गेल्या दोन महिन्यांपासून शहरात सुरू असलेली आठवडयातील एक दिवस पाणी बंदची कपात मागे घेण्यात आली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील उपलब्ध पाणीसाठयाचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
अवघ्या दहा मिनिटात हा निर्णय घेण्यात आला असून उद्या (रविवार) पासून शहरात पुन्हा पूर्वी प्रमाणेच नियमित पाणी देण्यात येणार आहे. दरम्यान, या निर्णयाबाबत दोन महिन्यांनी (60 दिवस) आढावा घेतला जाणार आहे. तर धरणसाखळीत उपलब्ध असलेले पाणी शेती, पाणी पुरवठा योजनांच्या तलावांना पुरेशा प्रमाणात देण्याचे आदेशही पाटील यांनी दिले आहेत.