पुणे । एखादी गोष्ट समजून सांगण्याची अथवा समोरच्याला त्याची चूक पटवून देण्याची पुणेकरांची तिरकस पद्धत प्रसिद्ध आहे. अशा पुणेरी पाट्या अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. यावेळी, पुणेरी पाट्यांची जागा एका व्हॉट्सऍप मेसेजने घेतली आहे. महावितरणकडून बिल वाटप करताना झालेल्या चुकीचा या पुणेरी व्हॉट्सऍप मेसेजद्वारे खरपूस समाचार घेण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्यातील नांदेड सिटीतील मंगल भैरव सोसायटीमध्ये महावितरणकडून वीज बिले पत्र पेटीत न टाकता दरवाज्यावर लटकवण्यात आली. याच हलगरजीपणाची महावितरणला जाणीव करुन देण्यासाठी खास पुणेरी भाषेमध्ये लिहिण्यात आलेला एक व्हॉट्सऍप मेसेज चर्चेचा विषय ठरला आहे.
‘तो’ पुणेरी व्हॉट्सऍप मेसेज…
मंगल भैरव सोसायटीमध्ये महावितरणकडून पाणी बचत आणि स्वच्छतेचा सामाजिक जाणीव म्हणून ‘अजब’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महावितरणचे बिल आत्ता पत्राचे पेटीत न टाकता इमारतीच्या दरवाजावर लावण्यात येतील.
त्यामुळे आपले पत्राची पेटी स्वच्छ आणि लवकर खराब होणार नाही. तसेच आपल्याकडून चुकून वीज बिल भरणा राहिला असल्यास आपले मित्र मंडळी किंवा सोसायटीमध्ये येणारे सर्व वेंडर्स यांना भरता येऊ शकतो…
सध्या सूर्य देव खूपच रागात आहेत त्यांचा प्रकोप आपण आणुभवत आहोतच. जास्त फिरल्याने महावितरण अधिकारी यांना खूप ताण लागते मग जास्त पाणी पिणार आधीच धरणात पाणी कमी आहे. पुणे तिथे काय उणे…
हेही वाचा
MP Dindori Accident | पिकअप वाहन उलटल्याने भीषण अपघात; 14 जणांचा मृत्यू