Sugar Factory | काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून थकहमी पोटी 147.79 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांच्यासह अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे, अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटे यांना देखील राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, सध्या काँग्रेसमध्ये (Congress) असलेले आणि भाजपला सातत्यानं मदत होईल अशी भुमिका घेणारे धनाजीराव साठे यांच्या संत कुर्मदास सहकरी कारखान्यालाही 59.49 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. त्यामुळेच सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, याआधी राष्ट्रिय सहकारी विकास निगमचा माध्यमातुन भाजप नेत्यांच्या कारखान्यांना जीवदान दिल्यानंतर आता अजित पवार यांनी देखील त्यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांच्या कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मदत मिळवून देत जीवदान दिले.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मदत केलेले कारखाने
१) भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना लक्ष्मी नगर नांदेड – 147.79 कोटी
व्यवस्थापन- अशोक चव्हाण
२) संत कुरुमदास सहकारी कारखाना पडसाळी सोलापूर – 59.49 कोटी
व्यवस्थापन – धनाजीराव साठे
३) सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखाना भाळवणी पंढरपूर- 146.32 कोटी रुपये
व्यवस्थापन – कल्याणराव काळे
४) छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर इंदापूर- 128 कोटी रुपये
व्यवस्थापन- प्रशांत काटे
५) जय भवानी सहकारी साखर कारखाना शिवाजीनगर, गेवराई, बीड- 150 कोटी रुपये
व्यवस्थापन – अमरसिंह पंडित