पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेत दोन्ही मिळून 195 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. प्रत्येक केंद्रांवर कोविशिल्डचे 210 तर कोवॅक्सिनचे प्रत्येकी 500 डोस मिळतील.
कोविशिल्ड लस ही 188 केंद्रांवर, तर कोव्हॅक्सिन ही लस 7 केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविशिल्डचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्याच्या ऑनलाइन बुकिंगची टक्केवारी 15 टक्के आहे, तर ऑन दी स्पॉट बुकिंगची टक्केवारीही 15 टक्के आहे.
तर कोव्हॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून तर 20 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
दि. 2 जूनपूर्वी पहिला डोस घेतलेल्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना गुरुवारी जी लस मिळणार आहे, त्याची टक्केवारी वाढवण्यात आली असून, ती 30 टक्क्यांवरून 35 टक्के केली आहे. शिवाय ऑन दी स्पॉट बुकिंगही 30 वरून 35 टक्के करण्यात आले आहे. 28 जुलैला कोव्हॅक्सीनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्या 18 वर्षांवरील नागरिकांना गुरुवारी 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 20 टक्केलस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.