पुणे – वारजे येथील शाळा पाडण्याची कारवाई महापालिकेकडून करण्यात आली होती. या कारवाईची चौकशी व्हावी व विद्यार्थ्यांसाठी नवीन इमारत व खेळाचे मैदान मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली विद्यार्थी, पालक, कर्मचाऱ्यांनी पुणे महापालिकेवर मोर्चा काढला.
विमल विद्या कुंज प्राथमिक, माध्यमिक मराठी शाळा व शानू पटेल इंग्रजी माध्यम शाळेत 2 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेच्या जागेच्या आरक्षणाबाबत अडचण निर्माण झाल्याने पालिकेकडून या शाळांवर बुलडोजर फिरविण्याची कारवाई केली. प्रकाश बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला व आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदनही देण्यात आले आहे.