पुणे : चोरी झालेले स्पीकर्स 8 ते 10 लाखांचे

पुणे – महापालिकेच्या बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहातील चोरी झालेल्या 12 स्पीकर्सची किंमत 8 ते 10 लाख रुपयेच असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी महापालिकेकडून गुन्हा दाखल करण्यासाठी या स्पीकर्सच्या कामाची निविदेची माहिती विद्युत विभागाने काढली असून हे 12 स्पीकर्स बॉक्‍ससह 12 लाख रुपयांचे आहेत. तर, चोरी केवळ बॉक्‍सच्या आतील स्पीकर्सची झालेली असल्याने त्याची किंमत 8 ते 10 लाखांच्या आसपास असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या मुख्यसभेत या सभागृहातील दोन कोटींचे साऊंड चोरीला गेल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्याची दखल घेत सांस्कृतिक विभागाने याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. हा गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी गेले असता, पोलिसांनी त्यांच्याकडून या संपूर्ण निविदांची तसेच स्पीकर्स संबंधिची सर्व माहिती घेऊन येण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने विद्युत विभागाकडे याबाबत माहिती मागविली होती. त्यानुसार, विद्युत विभागाने या सभागृहांच्या विद्युत कामासाठी एकूण 44 लाख रुपयांची निविदा काढली होती. त्यात, साऊंड सिस्टीमसाठी 12 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

चोरी ती चोरीच…
याप्रकरणी अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पालिकेकडे कागदपत्रांची मोठी यादी मागण्यात आली आहे. ही कागदपत्रे जमा करण्यासाठी पालिके चांगलीच दमछाक करावी लागणार आहे. त्यातच, आता स्पीकर्सची किंमत 8 ते 10 लाख असल्याचे समोर आल्याने गुन्हा दाखल केला जाईल की नाही याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र, चोरी ही चोरीच असते. ती कमी अथवा जास्त रकमेची नसते त्यामुळे या प्रकरणी पोलीस आणि महापालिकेने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली जात आहे.

पालिकेकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.