पुणे- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विलीनीकरण राज्य शासनात व्हावे यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एकीकडे कर्मचारी मागणीसाठी संपावर असल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय आणि खासगी वाहतूकदारांकडून होणारी आर्थिक लूट कायम आहे. तर, दुसरीकडे प्रशासनाकडून कारवाईचा बडगा सुरूच असून आतापर्यंत 393 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे.
राज्यभरातील एसटी कर्मचारी दि. 8 नोव्हेंबर 2021 पासून संपावर आहेत. यापैकी काही आगारांमधील कामकाज सुरू झाले असले तरी पूर्ण क्षमतेने कर्मचारी हजर झालेले नाहीत, त्यामुळे अजूनही उपस्थित कर्मचारी आणि कंत्राटी चालकांवर एसटी वाहतुकीची मदार आहे. तर, जिल्ह्यातील ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने खासगी वाहनांसह जीप, व्हॅन, वडाप, रिक्षा या वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. इतकेच नव्हे तर, यामुळे आर्थिक लुटीच्या बरोबर जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.
पुणे विभागात स्वारगेट, शिवाजीनगर, बारामती, दौंड, शिरूर, तळेगाव, राजगुरूनगर, भोर, नारायणगाव, इंदापूर, सासवड, पिंपरी-चिंचवड, बारामती एमआयडीसी ही आगारे आहेत. या आगारांतील तुरळक कर्मचारी हजर झाले आहेत. त्यामुळे सध्या धावणाऱ्या बसेसची संख्या कमी आहे. एसटीच्या पुणे विभागाच्या ताफ्यात 950 बसेस आहेत. मात्र,
आगारांमध्ये अशी आहे सद्यःस्थिती…
*कर्मचाऱ्यांकडून आंदोलन
*पोलिसांचा बंदोबस्त
*प्रवाशांमध्ये गोंधळ
*खासगी वाहनांची संख्या “जैसे थे’
* एसटी बसेस प्रमाण अत्यल्प
*स्थानकातील कर्मचाऱ्यांमध्ये देखील संभ्रम
*खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट