पुणे: इमारतीच्या पार्किंगमध्ये चक्क अडीच महिन्यापासून सांडपाणी साचले

लोकप्रिय नगरीतील रहिवासी नागरिक त्रस्त ; लाखो रुपये टॅक्‍स भरून देखील महापालिका व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
पुणे-
विश्रांतवाडी धानोरी रस्त्यावरील लोकप्रिया नगरी या सोसायटीमध्ये पावसाळी पाणी व सांडपाण्याच्या वाहिनीचे पाण्याचा समस्येला गेल्या अडीच महिन्यांपासून स्थानिक रहिवाशी त्रस्त झाले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींसह क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रार अर्ज विनंती करून देखील गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या सांडपाणी वाहुन नेणारीला वाहिनीमुळे सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाच ते सहा फुट सांडपाणी जमा झाले होत असुन सोसायटीच्या आवारात अस्वच्छता दुर्गंधी तसेच इमारतीच्या पायाला धोका निर्माण होऊ शकतो. या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सोसायटीतील स्थानिक नागरिक व रहिवाशांनी केली आहे.

विश्रांतवाडी परिसरातील लोकप्रिया नगरी या दीडशेहून अधिक फ्लॅट आहेत. मागील जुलै महिन्यापासून पावसाळी व सांडपाण्याच्या वाहिन्यांचे योग्य दुरुस्ती न केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोसायटीच्या पार्किंग मध्ये जमा झालेले आहे. लिफ्टच्या ड्‌क्‍टमध्ये पाणी जात असल्याने लिफ्टही बंद आहेत.सोसायटीतीच्या आवारातुन जाणाऱ्या या सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेकडून आवश्‍यक ती मोठ्या व्यासाची सांडपाण्याची वाहिनी टाकणे आवश्‍यक आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिकेचे अधिकारी येऊन पाहणी केलेली आहे.मात्र उपाययोजना अद्यापही केली नाही.अडीच महिन्यांपासून ही समस्या रहिवाशांना भेडसावत आहे. या इमारतीमध्ये काही वयोवृध्द नागरिक तरा काही रुग्णही आहेत.या सांडपाण्यामुळे दोघा जणांना डेंग्युचा आजारही झाला आहे. काहीनी आपले फ्लॅट रिकामे करुन इतर भाड्याने राहवयास गेले आहेत. सोसायटीच्या वतीने महापालिकेला दरवर्षी लाखो रुपये टॅक्‍स स्वरूपात भरले जातात. नियमित टॅक्‍स भरून देखील महापालिका नागरिकांचे प्रश्न सोडवू शकत नसेल तर हि खेदाची बाब असल्याचे सोसायटीचे सदस्य ऍड.दिपक गायकवाड यांनी सांगितले. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच महापालिकेने या गंभीर समस्यांची त्वरीत नोंद घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी लोकप्रिय नगरीतील स्थानिक नागरिक व रहिवासी यांनी यावेळी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.