पुणे – शाळांची किलबिल आजपासून

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज : पाठ्यपुस्तकेही मिळणार

पुणे – शहरी व ग्रामीण भागातील शाळा आज (सोमवार)पासून सुरू होणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली असून विद्यार्थ्यांचे विविध पद्धतीने जल्लोषात स्वागत करण्यासाठी शाळाही सज्ज झाल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगपालिका व खासगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांची दीड महिन्यांची सुट्टी संपली आहे. विद्यार्थ्यांनी आपापल्या पद्धतीने सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद लुटला ही वस्तुस्थिती आहे. विद्यार्थ्यांनी पर्यटनस्थळांच्या सहली, शिबिरे यातही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

आता सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस आनंददायी ठरावा यासाठी शाळांमधील व्यवस्थापन, शिक्षक, कर्मचारी यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सकाळ व दुपार अशा दोन सत्रात शाळा सुरू ठेवण्यात येतात. विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाबपुष्प देऊनही स्वागत होणार आहे. रांगोळ्या काढून व पताका लावून शाळांचा परिसर सजविण्याची लगबगही सुरू आहे. महापालिका व जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. खाऊ, आकर्षिक भेट वस्तू, पुस्तके, शालेय साहित्य यांचे वाटपही विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. शालेय साहित्याची खरेदी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता शाळेतील मित्र, शिक्षक यांना भेटण्याची ओढ निर्माण झाली आहे. काही विद्यार्थ्यांनी पहिल्या जुन्या शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेशही घेण्याची प्रक्रियाही पूर्ण केलेली आहे. मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी रिक्षा, बस, व्हॅनच्या काकांना पालकांकडून फोनद्वारे आठवण करून देण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक शाळांमधील वर्गात प्रवेश घेतलेल्या बालचमूना स्वत: पालकच शाळेत सोडायला येणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)