पुणे, दि. 20 -देशातील पहिली “ग्रेड फोर रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट सिस्टीम’मुळे सांधेरोपण शस्त्रक्रियेमध्ये आणखी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले. त्याचा फायदा रुग्णांना होणार असून, शस्त्रक्रियेतील हालचालीमध्ये सुलभता येणे शक्य आहे. रुग्णाला चालणे, फिरणे, प्रवास करणे, पोहणे, मांडी घालता येणे या क्रिया सुलभ पद्धतीने होतात, अशी माहिती डॉ. नरेंद्र वैद्य यांनी दिली.
पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये हे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेंद्र वैद्य यांनी 2016 मध्ये देशातील पहिली “रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी’ यशस्वी केली होती. गेल्या सहा वर्षात त्यांनी दहा हजाराहून अधिक रोबोटिक नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केल्या आहेत. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गुडघेदुखीचा त्रास असणाऱ्या रुग्णाच्या आयुष्यात आमूलाग्र बलल होणार असून, त्यांचे आयुष्य अधिक क्रियाशील होऊ शकते. रोबोटीक यंत्रणेमधील जगामधील अत्यंत प्रगत असणारी “ग्रेड फोर जनरेशन रोबोटिक सिस्टीम’ लोकमान्य हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आली.
डॉ. वैद्य यांनी या यंत्रणेच्या सहाय्याने रुग्णावर देशातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली. ही चौथ्या जनरेशनची रोबोटिक सिस्टीम असल्यामुळे ही जगातील सद्यस्थितीतील प्रगत यंत्रणा आहे. शस्त्रक्रियेमध्ये येणारी अचूकता, या शस्त्रक्रियेसाठी लागणारा वेळ कमी होतो. यामुळे शस्त्रक्रिया नंतर होणारा जंतू संसर्गाचा ही धोका कमी प्रमाणात दिसून येतो.
रुग्णाला असा होतो फायदा
शस्रक्रियेनंतर कोणत्याही प्रकारचा सिटीस्कॅन अथवा एमआरआय करण्याची गरज नाही
रेडियेशनचा त्रासही टळतो
रुग्णाच्या गुडघ्याची रिअल टाईम ईमेज ही सर्जनला स्क्रीनवर उपलब्ध होते
खराब कुर्चेचे अचूक मॅपिंग करुन तेवढाच भाग काढण्यासाठी सर्जनला मदत होते
सर्जरीमध्ये कमालीची अचूकता साधण्यासाठी सक्षम अशी यंत्रणा आहे
रुग्णाची नैसर्गिक अवयवांची रचना जतन करण्यात यंत्रणेचा बहुमोल उपयोग होतो